
जिल्हा माहिती
कार्यालय,
नाशिक
सारडा संकुल,
तिसरा
मजला,
नाशिक,
दुरध्वनी
क्र. 0253-2578686/2314114 फॅक्स क्र. 2578686
वृत्त क्रमांक:- 301 दि. 11 जुलै, 2013
मौजे- चाडेगांव येथे नगर भूमापन चौकशीचे काम सुरु
नाशिक दि. 11 :- मौजे- चाडेगांव ता. जि. नाशिक येथील नगर
भूमापन चौकशीचे काम दिनांक 24 जुलै, 2013 पासून सुरु झालेले आहे. मौजे चाडेगांव
ता. जि. नाशिक मधील गट नंबर –
159,160,161,164,168,173,174,307,355,356,358,360,361,362,363,368,369,370,372,373,375
व गावठाण पैकी मधील मिळकतींचे माहे जुलै,
13 मध्ये नाशिक मनपा, विस्तारीत क्षेत्रातील नगर भूमापन मिळकतींचे काम हाती
घेण्यात आलेले आहे. तरी संबंधित मिळकत धारक/ प्लॉट धारक/ गट नंबर चे धारक यांनी
तात्काळ विशेष उप अधिक्षक भूमि अभिलेख, तथा चौकशी अधिकारी, (श.मा.) क्र. 2 नाशिक
यांचे कार्यालयाशी संपर्क साधून मिळकती संबंधातील कायदेशीर कागदपत्रांसह माहिती
पुरवावी. तसेच खालील नमुद केलेल्या पत्यावर त्वरीत संपर्क साधावा अन्यथा मालकी
हक्काबाबत नियमानुसार चौकशी अंती निर्णय देण्यात येईल यांची संबंधितांनी नोंद
घ्यावी असे विशेष उप अधिक्षक भूमि अभिलेख, तथा चौकशी अधिकारी (श.मा.) क्र. 2 नाशिक
यांना कळविले आहे.
00000000
वृत्त क्रमांक:- 302
मौजे- गंगापूर येथे नगर भूमापन चौकशीचे काम सुरु
नाशिक
दि. 11 :- मौजे- गंगापूर ता. जि. नाशिक येथील नगर भूमापन चौकशीचे काम दिनांक 01
जुलै, 2012 पासून सुरु झालेले आहे. मौजे गंगापूर, ता. जि. नाशिक मधील सर्व्हे नंबर–74,76,77
व 125 मधील मिळकतींचे माहे जुलै, 13 मध्ये नाशिक मनपा, विस्तारीत क्षेत्रातील नगर
भूमापन मिळकतींचे काम हाती घेण्यात आलेले आहे. तरी संबंधित मिळकत धारक/ प्लॉट
धारक/ गट नंबर चे धारक यांनी तात्काळ विशेष उप अधिक्षक भूमि अभिलेख, तथा चौकशी
अधिकारी, (श.मा.) क्र. 2 नाशिक यांचे कार्यालयाशी संपर्क साधून मिळकती संबंधातील
कायदेशीर कागदपत्रांसह माहिती पुरवावी. तसेच खालील नमुद केलेल्या पत्यावर त्वरीत
संपर्क साधावा अन्यथा मालकी हक्काबाबत नियमानुसार चौकशी अंती निर्णय देण्यात येईल
यांची संबंधितांनी नोंद घ्यावी असे विशेष उप अधिक्षक भूमि अभिलेख, तथा चौकशी
अधिकारी (श.मा.) क्र. 2 नाशिक यांना कळविले आहे.
000000000

जिल्हा माहिती
कार्यालय,
नाशिक
सारडा संकुल,
तिसरा
मजला,
नाशिक,
दुरध्वनी
क्र. 0253-2578686/2314114
फॅक्स क्र. 2578686
वृत्त क्रमांक:- 303 दि. 11 जुलै, 2013
आदिवासी युवक/युवतीसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व
प्रशिक्षण सुरु
नाशिक
दि. 11 :- एकात्मिक आदिवासी विकास, प्रकल्प नाशिक, अंतर्गत आदिवासी युवक/
युवतीसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण चालविले जाते. दि. 1 ऑगस्ट, 13 पासून
4 महिन्याचे निवासी सत्र फक्त आदिवासी मुलांकरिता सुरु करण्यात येणार आहे.
पात्रता धारण करणा-या अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांनी दि. 24 व 25 जुलै,13 दरम्यान सैन्य व पोलीस दल भरतीपुर्व
प्रशिक्षण केंद्र, आदिवासी विकास वसाहत पेठरोड, नाशिक येथे संपर्क साधवा
प्रथम येणा-यास प्राधान्य दिले जाईल.
प्रशिक्षण अनिवार्य निवासी असून जास्तीत जास्त आदिवासी युवकांनी योजनेचा लाभ
घ्यावा. अधिक माहितीसाठी
0253-2577410 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे अवाहन प्रकल्प
अधिकारी, तथा अपर जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांनी केले
आहे.
00000000